चहासोबत टोस्ट-रस्क खाताय? जाणून घ्या, मैद्याचे शरीरावर होणारे घातक परिणाम
चहासोबत रस्क, बटर किंवा रोजच्या आहारातील मैद्याचे सेवन तुमच्या आतड्यांचे आरोग्य गंभीरपणे बिघडवत आहे. मुघल काळापासून सुरू झालेला मैद्याचा प्रवास आणि रोलर मिलच्या आगमनानंतर पिठातील पोषक घटक नष्ट झाल्याने पचनसंस्थेवर विपरीत परिणाम होत आहेत. मैद्यातील ग्लूटेन आणि ब्लिचिंग एजंट्समुळे सीलियाक विकार, मधुमेह, मायग्रेन आणि हाडांचे आजार वाढतात.