हाडं मजबूत असूनही वयानुसार तोल का जातो? जाणून घ्या पडण्याच्या भीतीमागचं विज्ञान!
वाढत्या वयासोबत हाडं कमकुवत नसतानाही अनेक ज्येष्ठ नागरिकांना चालताना किंवा जिना उतरताना पडण्याची भीती का वाटते? यामागे शरीराच्या तोल सांभाळण्याच्या क्षमतेचे एक गुंतागुंतीचे विज्ञान आहे. डोळे, कान आणि स्नायू यांच्या समन्वयाने मेंदू शरीर कसे सावरतो, जाणून घ्या. महत्त्वाचे म्हणजे संतुलन सुधारता येते. त्यासाठी अत्याधुनिक उपकरणांची गरज नसते. अनेक वेळा साध्या आणि सुरक्षित हालचालींमधूनही चांगले परिणाम मिळू शकतात.