उपचारादरम्यान अचानक तीव्र वेदना (पेन फ्लेअर अप) का होतात? जाणून घ्या कारणे आणि उपाय
दीर्घकाळ पाठदुखी, मानदुखी किंवा गुडघेदुखी असलेल्या रुग्णांना अचानक वेदना वाढण्याचा अनुभव येतो, ज्याला पेन फ्लेअर अप म्हणतात. हे उपचारादरम्यान होऊ शकतात आणि तात्पुरते असतात. यामागे शारीरिक श्रम, मानसिक ताण, झोपेतील बदल यांसारखी कारणं असू शकतात. फ्लेअर-अप्समुळे उपचार चुकीचे आहेत असा गैरसमज होऊ शकतो. फिजिओथेरेपीद्वारे योग्य मार्गदर्शन मिळाल्यास हे टप्पे पार करता येतात.