विश्रांतीच्या वेळीही हृदय धडधडतंय? हृदयाचे मिनिटाला १२० ठोके पडत असतील तर काय करावं?
विश्रांतीच्या वेळी स्मार्टवॉचवर प्रतिमिनिटाला १२० हृदयाचे ठोके पडत असतील तर हा गंभीर संकेत असू शकतो, असे डॉक्टर सांगतात. हृदयाच्या ठोक्यांमध्ये अनियमितता आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा असे सूचवले जाते. कारण स्मार्टवॉच तुम्हाला फक्त इशारा देऊ शकतो, हृदयाच्या समस्येचे निदान करू शकत नाही. यामुळे हृदयरोग तज्ज्ञांच्या सल्ल्याने उपचार घेणे गरजेचे ठरते.