व्यायाम करूनही मान-कंबर का दुखते? ऑफिसमध्ये काम करताना फॉलो करा या सोप्या स्टेप्स!
दिवसभराच्या शेवटी मान आणि कंबर दुखण्याचे मुख्य कारण म्हणजे 'नॉन-एक्सर्साइज अवर्स'. शिरीष, एक इंजिनियर, नियमित व्यायाम करूनही मानदुखी आणि कंबरदुखीने त्रस्त होता. यावर उपाय म्हणून 'मूवमेंट स्नॅक्स' संकल्पना महत्त्वाची ठरते. दिवसभरात छोटे-छोटे हालचालींचे ब्रेक्स घेणे, जसे की दोन मिनिटं चालणं, खुर्चीतून उठणं, हात-पाय हलवणं, यामुळे रक्तपुरवठा सुधारतो, स्टिफनेस कमी होतो आणि शरीर रिफ्रेश होते.