झोपेत दात चावले की नेमकं काय होतं? ताण आणि चिंतेचा दातांवर काय परिणाम होतो?
ब्रुक्सिझम म्हणजे झोपेत नकळत दात चावण्याची सवय, ज्यामुळे जबड्यात वेदना, डोकेदुखी आणि दातांची संवेदनशीलता वाढते. दंतवैद्य डॉ. बिभाकर रंजन यांच्या मते, कस्टम-मेड नाईट गार्ड वापरल्याने दातांची झीज थांबवता येते. मानसिक ताण, चिंता आणि झोपेच्या समस्यांमुळे ब्रुक्सिझम वाढतो. यामुळे योग्य वेळी उपचार घेणे महत्वाचे असते.