जीभेच्या कर्करोगात मानेची शस्त्रक्रिया टाळता येणार? सेंटिनेल नोड बायोप्सी पद्धत नेमकी काय?
जीभेचा कर्करोग झाल्यानंतर तो मानेतील लसिका ग्रंथीपर्यंत पोहोचलाय का? हा प्रश्न सर्वांना पडतो. कर्करोग रोखण्यासाठी मोठी शस्त्रक्रिया करावी लागेल, अशी चिंता सर्वांना सतावते. मात्र मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात 'सेंटिनेल नोड बायोप्सी' या नव्या आणि अचूक पद्धतीद्वारे मानेच्या लसिका ग्रंथीतील पेशी लवकर ओळखता येणे शक्य होणार आहे. यामुळे पुन्हा कर्करोग होण्याचा धोका टाळता येणार आहे.