तुकाराम मुंढे यांचे पुढचे टार्गेट न्युट्रासिटिकल्स आणि दारू! ६०% हून अधिक भेसळ उघडकीस
अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे आता ॲक्शन मोडमध्ये आले असून त्यांचे पुढचे टार्गेट प्रोटिन पावडर (न्युट्रासिटिकल्स) आणि भेसळयुक्त दारू आहे. दारूमध्ये तब्बल ६० टक्क्यांहून अधिक भेसळ होत असल्याचे समोर आल्यानंतर आता कठोर पावले उचलली जात आहेत. सर्वसामान्य नागरिकांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी आणि अन्नभेसळीला आळा घालण्यासाठी एफडीएतर्फे राज्यभरात मोठी मोहीम राबवली जाणार आहे.