डाएट एकच, पण रिझल्ट वेगवेगळा! पुरुषांच्या तुलनेत महिलांचे वजन हळू कमी का होते?
अनेकांनी आपल्या घरात एका गोष्टीच निरीक्षण केलंच असेल, ते म्हणजे घरातील आई-वडील सारखाच आहार घेत असतील, एकत्र व्यायामाला जात असतील; किंबहुना तुमची आई- वडिलांपेक्षा जास्त कष्ट करत असूनही, तिचे वजन कमी होण्यात मात्र अनंत अडचणी येत असतात. त्यामुळे वजन कमी करण्याचे जुने उपाय सर्वांसाठीच योग्य असल्याचा समज नव्या संशोधनाने मोडीत काढला आहे. त्याच नव्या संशोधांनाचा घेतलेला हा आढावा.