जन्मानंतर पहिल्या १००० दिवसांत बाळाला साखर का देऊ नये? संशोधन काय सांगते?
काळ सणासुदीचा असो वा नसो अनेकांना साखरयुक्त गोड पदार्थांवर ताव मारण्याची सवय असते. स्वतःबरोबरच लहानांचंही तोंड गोड करण्याचा आग्रह असतो. परंतु मूल जन्मल्यानंतरचे पहिले हजार दिवस साखरेचं प्रमाण अत्यंत बेताचं असणं आवश्यक असतं. अन्यथा वाढत्या वयात कितीतरी असाध्य रोग माणसाचा पिच्छा पुरवतात, असं केंब्रिज विद्यापीठात झालेल्या संशोधनातून पुढे आलं आहे.