जिममध्ये व्यायाम करताना अचानक हृदयविकाराचा झटका का येतो? डॉक्टर काय सांगतात?
आसाममधील एका ४७ वर्षीय डॉक्टरांना जिममध्ये व्यायाम करताना हृदयविकाराच्या झटका आला आणि ते कोसळले. बाह्य शारीरिक तंदुरुस्ती म्हणजे निरोगी हृदय नव्हे, असे तज्ज्ञ सांगतात. शरीरात दडलेल्या काही विकारांमुळे व्यायामादरम्यान हृदयावर अचानक ताण येतो. चाळिशीनंतर धोका का वाढतो, शरीराने दिलेले कोणते संकेत दुर्लक्षित करू नयेत, याबाबत डॉक्टरांनी माहिती दिली.