किडनी खराब झाली तर हृदय धोक्यात! धोका टाळण्यासाठी ‘या’ ५ सवयी त्वरित बदलण का गरजेचं?
किडनीच्या आजाराचा परिणाम केवळ मूत्रपिंडांपुरता मर्यादित राहत नाही. उलट, किडनीचे आरोग्य बिघडल्यास हृदयविकाराचा धोका लक्षणीयरीत्या वाढतो. जागतिक स्तरावर किडनीचा आजार आता मृत्यूचे पाचवे प्रमुख कारण ठरण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. त्यामुळे 'Save your kidneys to protect your heart' हा संदेश केवळ सुदृढ आरोग्याचा सल्ला नसून एक महत्त्वाचा वैद्यकीय इशारा आहे.