सकाळची ‘ही’ चूक आणि लिव्हर होईल खराब! आजच बदला सवय नाहीतर होतील गंभीर परिणाम…
Liver Damage Habits: सकाळची सुरुवात तुमचा संपूर्ण दिवस कसा जाणार आहे हे ठरवते. बहुतेक लोक सकाळी घाईघाईने चहा पितात, नाश्ता टाळतात किंवा उठताच तणावात जातात. पण तुमच्या या साध्या वाटणाऱ्या सवयी तुमच्या शरीरातील एक खूप महत्त्वाचा पण अनेकदा दुर्लक्षित राहणारा अवयव – यकृत (लिव्हर) - याला नुकसान करत असतील तर?
यकृत शांतपणे शरीरातील घाणेरडे घटक बाहेर काढते, चरबी आणि साखर पचवते, औषधे व दारूचे परिणाम कमी करते आणि शरीर नीट चालू ठेवते. हृदय किंवा मेंदूसारखे यकृत लगेच त्रास दाखवत नाही.