४० वर्षांखालील महिलांना होतो ‘हा’ गंभीर आजार! साधी वाटणारी ‘ही’ ५ लक्षणे वेळीच ओळखा…
Heart Attack Symptoms in Women Early 40s: अलीकडील अभ्यासातून हे स्पष्ट झाले आहे की, ४० वर्षांखालील महिलांमध्ये हार्ट अटॅकची प्रकरणे वेगाने वाढत आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे सतत तणावपूर्ण जीवनशैली, अपुरी झोप आणि सुरुवातीची लक्षणे, ज्याकडे महिला अनेकदा दुर्लक्ष करतात. उदा. सतत थकवा जाणवणे, श्वास लागणे किंवा थोडे चालले तरी छातीत जडपणा वाटणे. अनेक वेळा महिला ही लक्षणे साधा ताण, कमजोरी किंवा आहाराशी संबंधित समस्या समजतात, त्यामुळे योग्य उपचार उशिरा मिळतात.