महिलांनो हल्ली खूप थकवा येतो? असू शकतं हार्ट अटॅकचं लक्षण; सुरुवातीची ही लक्षणे जाणून घ्या
Heart Attack Symptoms in Women: महिलांमध्ये हार्ट अटॅक नेहमी टीव्ही किंवा जाहिरातींमध्ये दाखवतात तसा दिसत नाही - म्हणजे अचानक जोरात छातीत दुखणे किंवा लगेच बेशुद्ध पडणे.
खरंतर, महिलांमध्ये हार्ट अटॅकची लक्षणे खूप हलकी आणि हळूहळू दिसू लागतात, जसे की खूप थकवा जाणवणे, पोटात मळमळ होणे, श्वास घेण्यात त्रास होणे किंवा अस्वस्थ वाटणे. त्यामुळे ही लक्षणे अनेकदा दुर्लक्षित होतात आणि उपचार उशिरा होतात. ही लपलेली चिन्हे ओळखणे आणि वेळेवर डॉक्टरांकडे जाणे खूप महत्त्वाचे आहे.