पाय सुजतायत? ९०% लोक करतात ‘ही’ चूक! हृदयविकाराच्या गंभीर आजाराची असू शकते सुरूवात…
Heart failure warning sign: हार्ट फेल्युअर म्हणजे अशी अवस्था आहे की ज्या वेळी हृदयाच्या स्नायूंना शरीरात रक्त नीट पंप करता येत नाही. असे झाल्यावर रक्ताचा प्रवाह मंदावतो आणि शरीरात पाणी (द्रव) साचू लागते. कधी कधी हे पाणी फुफ्फुसांमध्येही साचते, त्यामुळे श्वास घेण्यास त्रास होतो. तज्ञांच्या मते, शरीरात काही असे संकेत दिसतात ज्यावरून हृदयाची तब्येत ठीक नाही हे ओळखता येते. त्यापैकी एक कमी लक्षात येणारा पण महत्त्वाचा संकेत म्हणजे टाचांमध्ये आणि पायांमध्ये येणारी सूज. चला तर मग, याबद्दल थोडक्यात जाणून घेऊया.