सकाळी उठताच पोट होईल साफ! झोपण्याआधी दुधात ‘हे’ तेल टाका; आतड्यांमधली सगळी घाण पडेल बाहेर
How to clean Stomach: हिवाळ्यात बद्धकोष्ठतेची समस्या खूप लोकांना होते, कारण या काळात शरीराची हालचाल कमी होते आणि पाण्याचे सेवनही कमी होते. ऑक्टोबरपासूनच अनेक लोकांना बद्धकोष्ठतेचा त्रास सुरू होतो. थंडीमुळे लोक पुरेसं पाणी पित नाहीत, त्यामुळे पचन मंदावते आणि आतड्यांची हालचाल कमी होते. याशिवाय, हिवाळ्यात जड, तळलेले पदार्थ जास्त खाल्ले जातात, ज्यामुळे पोटात गॅस, ब्लोटिंग आणि त्रास होतो.