रात्री ‘ही’ एक गोष्ट कराल तर हार्ट अटॅक जवळही येणार नाही! ब्लड प्रेशरही राहेल नियंत्रणात
Heart Healthy Habits: नवीन अभ्यासात आढळले आहे की दररोज एकाच वेळी झोपणे हृदयाच्या आरोग्यावर चांगला परिणाम करू शकते आणि ब्लड प्रेशर नियंत्रित ठेवण्यास मदत करू शकते. साधारणपणे झोपेच्या तासांवर भर दिला जातो, पण संशोधक म्हणतात की आपण कधी झोपतो हेही तितकंच महत्त्वाचं आहे.
Sleep Advances या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या या संशोधनानुसार, रात्रीच्या दिनक्रमात छोटे बदल केल्याने उच्च रक्तदाब असलेल्या अनेक लोकांना फायदा होऊ शकतो. अभ्यासात आढळले की झोपेची वेळ आणि हृदयाचे आरोग्य यामध्ये संबंध आहे.