रोज रात्री मोबाईल वापरता? कमी झोपेमुळे वाढतो हार्ट अटॅक, स्ट्रोकचा धोका, दिसतात ही लक्षणे
Lack of Sleep Disease: धावपळीच्या जीवनात आणि कामाच्या ताणामुळे लोक अनेकदा झोप कमी घेतात, पण ही सवय हृदयासाठी धोकादायक ठरू शकते. अलीकडच्या संशोधनानुसार, ६ तासांपेक्षा कमी झोप घेतल्यास शरीरात ताण वाढवणारे हार्मोन्स सक्रिय होतात. यामुळे ब्लड प्रेशर आणि कोलेस्ट्रॉलवर वाईट परिणाम होतो.