पीएम मोदींनी सांगितले आवळ्याचे ‘हे’ जबरदस्त फायदे
PM Modi Mann Ki Baat Amla Benefits : रविवारी 'मन की बात'च्या १३८ व्या भागात देशवासीयांना संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी आवळ्याच्या फायद्यांविषयी माहिती दिली. ते म्हणाले की, आपले पूर्वज पिढ्यानपिढ्या आवळ्याच्या गुणधर्मांबद्दल सांगत आले आहेत. आवळ्याचे लोणचे, मोरंबा (मुरब्बा), रस (ज्यूस) आणि च्यवनप्राश आपल्या घरांमध्ये शतकानुशतके वापरले जात आहे.