“भातापेक्षाही जास्त खराब…” पोहे खाणं शरीरासाठी घातक कारण…, शेफ संजीव कपूर यांचं वक्तव्य
Poha Unhealthy for Health: तुमच्या घरी पोहे हा नेहमीचा नाश्ता असतो का? अनेक भारतीयांसाठी पोहे हा आठवड्यातून किमान एकदा तरी खाल्ला जाणारा पदार्थ आहे - हलका, आरामदायी आणि पटकन बनणारा. काही घरांमध्ये तर पोह्यांसोबत कुरकुरीत जलेबी खाण्याचीही खास पद्धत असते. मात्र सेलिब्रिटी शेफ संजीव कपूर यांना पोहे हा फार हेल्दी नाश्ता वाटत नाही.