शिवजयंतीच्या प्रियजनांना द्या खास मराठी शुभेच्छा! स्टेटसला पोस्ट करा सुंदर मेसेज…
दरवर्षी १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती साजरी केली जाते. या दिवशी भारतभरात, विशेषतः महाराष्ट्रात, स्मरण सभा, शौर्यदर्शक कार्यक्रम, व्याख्याने आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. ही जयंती शिवाजी महाराजांच्या शौर्य, कर्तृत्व, दूरदर्शी नेतृत्व आणि स्वराज्यस्थापनेच्या आदर्शांना उजाळा देण्याचा एक मार्ग आहे. या दिवशी सोशल मीडियावर शिवजयंतीच्या शुभेच्छा दिसून येतात. चला तर मग छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त प्रत्येक शिवप्रेमीला, मित्रपरिवाराला खास शुभेच्छा पाठवूया आणि शिवरायांना अभिवादन करूया…