एकट्या महिला एकट्या पुरुषांपेक्षा जास्त सुखी; नव्या अभ्यासातील दावा चर्चेत! वाचा सविस्तर…
मानवी मनाचा ठाव लागणे कठीण आहे, पण त्याचे प्रयत्न सुरूच असतात. अशाच एका अभ्यासातून समोर आलेला निष्कर्ष चर्चेत आहे. 'सोशल सायकोलॉजिकल अँड पर्सनॅलिटी सायन्स'मध्ये प्रकाशित झालेल्या शोधनिबंधानुसार, एकट्या राहणाऱ्या महिलांपेक्षा पुरुष कमी सुखी असतात. २०२०-२०२३ दरम्यान ५९४१ व्यक्तींवर केलेल्या अभ्यासातून हे निष्कर्ष काढले आहेत. महिलांना जीवन, लैंगिक सुख, आणि जोडीदाराविषयी कमी अपेक्षा असल्याने त्या अधिक समाधानी असतात.