ऑनलाईन गेमच्या व्यसनाने घेतला ३ बहिणींचा जीव! असे गेम मुलांच्या मनावर कसे परिणाम करतात…
Online Gaming Sisters Died: गाझियाबादमधील एका उंच इमारतीच्या सोसायटीत नवव्या मजल्यावरून उडी मारल्यानंतर तीन अल्पवयीन बहिणींचा मृत्यू झाला. मृतांमध्ये १६ वर्षांची एक मुलगी आणि तिच्या १४ व १२ वर्षांच्या दोन सावत्र बहिणींचा समावेश आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासात काही धक्कादायक गोष्टी समोर आल्या असून, त्या मुलींना एका ऑनलाइन गेमचे खूप व्यसन असल्याचे आढळले आहे. या घटनेमुळे पोलीस, पालक व मानसिक आरोग्य तज्ज्ञ सर्वच चिंतेत आहेत.