मैत्रीत मतभेद निर्माण झाले तर मैत्री संपवावी की टिकवावी? नातं टिकवण्यासाठी काय करावं?
सोशल मीडियावर ‘कट-ऑफ कल्चर’ चा ट्रेंड आला आहे. मित्रांशी मतभेद निर्माण झाल्याने मित्राला टॉक्सिक ठरवलं जातं. परंतु, प्रत्येक प्रसंगात असं करणं योग्य असतं का? तज्ज्ञ सांगतात की, नात्यातील अस्वस्थता समजून घेणे महत्त्वाचे असले तरी थेट नातं तोडण्यापेक्षा स्वत:ला काही प्रश्न विचारणं महत्वाचं ठरतं.