कडक उन्हात तुळस सुकतेय? ‘ही’ २ रुपयांची वस्तू टाकताच होईल कमाल; तुळस होईल हिरवीगार…
Tulsi Drying Tips: हिंदू धर्मात तुळशीच्या रोपाला खूप पवित्र मानलं जातं. जवळपास प्रत्येक भारतीय घराच्या अंगणात किंवा बाल्कनीत तुम्हाला तुळशीचं रोप दिसेल. पण मे-जूनच्या कडक उन्हाळ्यात आणि प्रचंड उष्णतेमुळे या नाजूक रोपाची अवस्था खराब होऊ लागते. जोरदार ऊन आणि गरम वाऱ्यांमुळे तुळशीची पानं करपतात, रोप सुकून काठीसारखं होतं आणि त्याची वाढ पूर्णपणे थांबते.