मेकअपसाठी BB, CC, DD क्रीम्स वापरता का? मग यात फरक काय? घ्या जाणून….
आजकाल बाजारात स्किन केअरपासून मेकअपचे अनेक प्रॉडक्ट्स उपलब्ध आहेत. ज्याचा वापर वेगवेगळ्या कारणांसाठी केला जातो. पूर्वी फाउंडेशन, मॉइश्चरायझर, टोनर व सनस्क्रीन अशा वेगवेगळ्या क्रीम्सची गरज होती; पण आता एकाच क्रीममध्ये हे सर्व घटक असतात. त्यामुळे वेगवेगळ्या क्रीम्सची गरज लागत नाही. बाजारात BB, CC व DD क्रीम्ससारख्या अनेक क्रीम्स उपलब्ध आहेत, पण, अनेकांना या क्रीम्सबद्दल नीटशी माहिती नसते. त्यामुळे BB, CC, व DD क्रीम्सचा नेमका वापर कशासाठी केला जातो, यात नेमका काय फरक आहेत ते समजून घेऊया.