पांढरा भात की ब्राउन राइस? जाणून घ्या वजन आणि शुगरसाठी कोणता चांगला…
White Rice vs Brown Rice Benefits: भात हा आपल्या आहाराचा अविभाज्य भाग आहे. अनेकांच्या ताटात भाताशिवाय जेवण पूर्णच होत नाही. मात्र, भात खाल्ल्याने वजन वाढते किंवा रक्तातील साखर वाढते, असा समज असल्याने काही जण भात पूर्णपणे टाळतात. पण भाताचा प्रकार आणि त्याचे प्रमाण याकडे लक्ष दिल्यास चित्र थोडे वेगळे असू शकते. पांढऱ्या तांदळाच्या तुलनेत ब्राउन राइस अर्थात तपकिरी तांदूळ अधिक पौष्टिक पर्याय मानला जातो.