पंतप्रधान मोदींच्या पोस्टनंतर ‘कोण संजय राऊत’ म्हणणाऱ्या विरोधकांचाही पोस्टचा रतीब
शिवसेनेचे (ठाकरे) नेते संजय राऊत यांनी आजारामुळे दोन महिन्यांची विश्रांती घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या प्रकृतीविषयी चिंता व्यक्त केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर नेत्यांनीही त्यांना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. यानंतर विरोधकांनीही त्यांच्या प्रकृतीविषयी काळजी व्यक्त करत लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.