महायुतीचं ठरलं! मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्री पदाबाबत अजित पवारांचं मोठं विधान, म्हणाले…
महाराष्ट्रात महायुती सरकारला बहुमत मिळालं असतानाही मुख्यमंत्री आणि इतर पदांवरून सत्तास्थापनेचा पेच निर्माण झाला आहे. मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदे अडून होते, परंतु त्यांनी अडसर नसल्याचं स्पष्ट केल्यानंतर हालचाली वाढल्या. अजित पवारांनी सांगितलं की, भाजपाचा मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री असतील. मंत्रिमंडळाच्या चर्चेसाठी मुंबईतील बैठक रद्द करण्यात आली होती.