अजित पवारांची प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत शरद पवारांशी भेट; कशावर झाली चर्चा? म्हणाले…
राजधानी दिल्लीत सध्या राजकीय वातावरण तापले आहे. शरद पवारांच्या ८५व्या वाढदिवसानिमित्त अजित पवारांनी सहकुटुंब त्यांच्या निवासस्थानी भेट दिली. या भेटीत विविध राजकीय मुद्द्यांवर चर्चा झाली. अजित पवारांनी शरद पवारांना शुभेच्छा देण्यासाठी आलो असल्याचे सांगितले. मंत्रिमंडळाच्या शपथविधीबाबत अजित पवारांनी १४ डिसेंबरला शपथविधी होण्याची शक्यता व्यक्त केली. त्यामुळे संभाव्य मंत्र्यांची चर्चा सुरू झाली आहे.