“राज्यात फक्त दोनच साहेब, एक शरद पवार, दुसरे…”, अमोल कोल्हेंचं अजित पवारांना प्रत्युत्तर
राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या 'साहेब' टिप्पणीवर टीका केली आहे. कोल्हे म्हणाले, "राज्यात फक्त दोनच साहेब आहेत - शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे. केवळ पक्षाचा अध्यक्ष होणे म्हणजे साहेब होणे नाही. त्यासाठी सांस्कृतिक आणि सामाजिक व्यासंग असावा लागतो." अजित पवार यांनी उमेदवारीबाबत केलेल्या वक्तव्यावर कोल्हे यांनी ही प्रतिक्रिया दिली.