‘गरबा सर्वांचा उत्सव’, अमृता फडणवीस यांच्यामुळं भाजपाची कोंडी? विहिंप मुस्लिम बंदीवर ठाम
नवरात्रोत्सवातील गरबा आणि दांडिया कार्यक्रमांमध्ये मुस्लिमांना प्रवेशबंदी करण्याच्या विहिंपच्या मागणीवरून मतभेद उफाळले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी सर्वसमावेशक भूमिका मांडल्याने भाजपाची कोंडी झाली आहे. विहिंपने मुस्लिमांवर बंदीची मागणी कायम ठेवली आहे, तर भाजपाने सावध भूमिका घेतली आहे. काँग्रेसने नितेश राणेंच्या हकालपट्टीची मागणी केली आहे.