“मी अॅक्सिसमध्ये असताना माझ्यासमोर धर्मांतरणाची प्रकरणे झाली”, अमृता फडणवीसांची माहिती
नाशिकच्या टीसीएस कंपनीत गेल्या चार वर्षांपासून लैंगिक शोषण, विनयभंग आणि धार्मिक भावना दुखावणे आदी प्रकार सुरू होते, याप्रकरणी गुन्हे दाखल झाले आहेत. या घटनेवर अमृता फडणवीस यांनी भाष्य करताना अॅक्सिस बँकेत असताना त्यांच्यासमोरही असे प्रकार घडल्याचे सांगितले. त्यांनी व्हिसल ब्लोइंगचे महत्त्व अधोरेखित केले. टीसीएसने तक्रारींची चौकशी सुरू केली असून कर्मचाऱ्यांना 'वर्क फ्रॉम होम' करण्यास सांगितले आहे.