“वाल्मिक कराड ठणठणीत आहेत”, अंजली दमानियांनी शेअर केला नवा VIDEO; म्हणाल्या…
बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात अटकेत असलेल्या वाल्मिक कराडची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विरोधकांचा दावा आहे की, जामीन मिळवण्यासाठी हे केले जात आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही यावर प्रश्न उपस्थित केले आहेत आणि कराडच्या वैद्यकीय अहवालांची सार्वजनिक तपासणी करून त्यांना तुरुंगात हलवण्याची मागणी केली आहे.