सासरे-दिराकडून मयुरी जगतापला अश्लील शिवीगाळ? अंजली दमानियांकडून ‘ते’ पत्र शेअर
वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणात मयुरी जगतापने राज्य महिला आयोगाला पत्र लिहून तिच्यावर होणाऱ्या अन्यायाची तक्रार केली होती. तिच्या भावाने ६ नोव्हेंबर २०२४ रोजी पत्राद्वारे तक्रार दाखल केली. अंजली दमानिया यांनी महिला आयोगावर टीका करत हे पत्र शेअर केले. पत्रात सासरच्या लोकांनी मारहाण, शिवीगाळ, आणि हुंड्याची मागणी केल्याचा उल्लेख आहे.