ठाकरे गटातील दुसऱ्या फुटीमुळे संभ्रम; कायदेशीर पेचप्रसंग काय आहे?
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी उलथापालथ होत आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील सहा खासदार बंडखोरी करून वेगळा गट स्थापन करणार असल्याचा दावा केला जात आहे. शिवसेनेकडून सर्व खासदारांना व्हिप बजावला गेला असून, उत्तर न दिल्यास अपात्रतेची कारवाई होईल. पक्षांतर बंदी कायद्याबाबत अनंत कळसे यांनी सविस्तर माहिती दिली.