अशोक खरातच्या व्हिडिओमध्ये महिला एन्जॉय करताना दिसतायत? आशा मिरगेंनी काय सांगितलं?
नाशिकच्या भोंदूबाबा अशोक खरात याचे काळे कारनामे उघडकीस येत आहेत. ज्योतिषाच्या नावाखाली त्याने महिलांचे शोषण केले. ओश्नोजल नावाने कफ सिरपमध्ये मूत्र आणि वायग्रा मिसळून महिलांना गुंगी आणायचा. महिलांना योनी पूजेच्या नावाखाली फसवून लैंगिक शोषण करायचा. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर महिलांच्या प्रतिकाराचा अभाव दिसल्याने आशाताई मिरगे यांनी या प्रकाराविषयी स्पष्टीकरण दिलं आहे.