“माझा मुलगा पुण्यात…”; बाबा सिद्दीकींची हत्या करणाऱ्या आरोपीच्या आईची प्रतिक्रिया!
राज्याचे माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर मुंबई पोलीस या प्रकरणाचा चहुबाजूंनी तपास करत आहेत. याप्रकरणी दोन हल्लेखोरांना शनिवारी अटक करण्यात आली आहे. गुरमैल सिंग आणि धर्मराज कश्यप अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत, तर शिवकुमार नावाचा आरोपी फरार आहे. या हल्ल्यामागे बिश्नोई गँग असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर आता या प्रकरणातील आरोपींच्या कुटुंबातील सदस्यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.