बाबा सिद्दीकींची हत्या करणारा ‘तो’ आरोपी अल्पवयीन नाही, २१ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची दसऱ्याच्या दिवशी वांद्रे येथे त्यांच्या मुलाच्या कार्यालयात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या प्रकरणात गुरनैल सिंह आणि धर्मराज कश्यप या दोघांना अटक करण्यात आली. धर्मराजने अल्पवयीन असल्याचा दावा केला होता, परंतु ऑसिफिकेशन चाचणीत तो अल्पवयीन नसल्याचे सिद्ध झाले. या प्रकरणात आणखी एकाला पुण्यातून अटक करण्यात आली आहे.