ठरलं! बारामतीत सुनेत्रा पवारांना काँग्रेसचं आव्हान; बिनविरोधचा मार्ग बंद, आता थेट लढत
केंद्रीय निवडणूक आयोगाने बारामती विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक जाहीर केली आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली होती. महायुतीने सुनेत्रा पवार यांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेसनेही उमेदवार देण्याचे निश्चित केले आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ही भूमिका जाहीर केली. जय पवार यांनी निवडणूक बिनविरोध व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली, परंतु विरोधकांना लढायचे असल्यास त्यांनी लढावे असेही सांगितले.