‘एकनाथ शिंदेंमुळेच भाजपा सत्तेत’, शिवसेनेच्या मंत्र्यांचे विधान; भाजपाला डिवचलं
सत्ताधारी महायुतीतील शिवसेना (शिंदे) आणि भाजपा पक्षांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीदरम्यान तीव्र संघर्ष पाहायला मिळाला. नुकत्याच एका कार्यक्रमात भाजपाचे नेते मंगलप्रभात लोढा यांनी २०१४ पर्यंत भाजपाची ताकद नव्हती असे विधान केले. यावर शिवसेनेचे मंत्री शंभुराज देसाई यांनी प्रत्युत्तर देत, २०१४ नंतरच्या राजकीय स्थित्यंतरांचा उल्लेख केला. त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेमुळे भाजपाला सत्तेत चांगला वाटा मिळाल्याचे सांगितले.