Home Ministry : गृहखातं देण्यास भाजपाचा नकार; शिवसेनेला ‘या’ खात्यांचा दिला पर्याय!
राज्यात सरकार स्थापन झाल्यानंतर खातेवाटप रखडले आहे. एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपदी असून गृहखात्यावर अडून आहेत, तर भाजपा गृहखातं सोडण्यास तयार नाही. भाजपाने शिंदेंना महसूल, नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम खाते देऊ केले आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार हिवाळी अधिवेशनापूर्वी होणार आहे. भाजपाकडे गृहखातं ठेवण्याचा आग्रह असून, शिवसेनेला इतर महत्त्वाची खाती देण्याची शक्यता आहे.