“हे खातं माझ्याकडे तिसऱ्यांदा आलं आहे…”; पदभार स्वीकारताच काय म्हणाले छगन भुजबळ?
छगन भुजबळ यांचा देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात समावेश झाला असून, त्यांनी अन्न आणि नागरि पुरवठा खात्याची जबाबदारी स्वीकारली आहे. भुजबळ यांनी शिवभोजन थाळी योजना बंद होणार नसल्याचे स्पष्ट केले. त्यांनी सांगितले की, महायुती सरकार आल्याने कोणतीही योजना बंद झालेली नाही. काही योजनांमध्ये अपात्र लोकांचा फायदा होतो, त्यावर कारवाईसाठी समिती नेमली आहे.