मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या मुलीला दहावीत ९२ टक्के गुण, वर्षा बंगल्यावर पूजा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुली दिविजा फडणवीसला दहावीच्या परीक्षेत ९२.६० टक्के गुण मिळाले आहेत. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर फडणवीस कुटुंब वर्षा निवासस्थानी राहण्यास गेले आहेत. अमृता फडणवीस यांनी पोस्टद्वारे ही माहिती दिली आहे. त्यांनी गृहप्रवेशाच्या पूजेची आणि दिविजाच्या यशाची बातमी शेअर करत सर्वांना अक्षय तृतीयेनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.