MPSC च्या अध्यक्षांचा राजीनामा घेणार का? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले..
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे (एमपीएससी) अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले की, एमपीएससी अध्यक्षांना हटवणे राज्य सरकारच्या हातात नाही, ते फक्त राष्ट्रपतींच्या शिफारशीनंतरच शक्य आहे.