छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण, देवेंद्र फडणवीस म्हणाले; “त्या
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मालवणमधील राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या ९१ फुटांच्या पुतळ्याचे अनावरण केले. या सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे, मंत्री नितेश राणे उपस्थित होते. फडणवीस यांनी पुतळ्याच्या उभारणीसाठी घेतलेल्या निर्धाराचा उल्लेख केला. शिल्पकार सुतार यांनी तयार केलेला हा पुतळा तुफान आणि वादळांना तोंड देईल, असे फडणवीस म्हणाले. पुतळ्याची देखभाल पुढील १० वर्षे शिल्पकारांकडे असेल.