आम्ही दोन वर्षात राज्याला प्रगतीपथावर नेले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे प्रतिपादन
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ७८ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त मंत्रालयात ध्वजारोहण करून जनतेला शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्राच्या प्रगतीची गती कायम ठेवण्याचे उद्दिष्ट त्यांनी मांडले. राज्याच्या विकासासाठी विविध कल्याणकारी योजना राबविल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सहकार्याने महाराष्ट्राचे ग्रोथ इंजिन वेगाने धावत आहे. राज्याच्या अर्थव्यवस्थेची सुधारणा आणि रोजगार निर्मितीवर त्यांनी भर दिला.