मुंबईकरांना महागाईचा झटका! CNG च्या दरात २ रुपयांची वाढ, तर PNG मध्ये ५० पैशांची वाढ
मुंबई सीएनजी दरवाढ: पेट्रोल-डिझेलच्या सतत वाढत्या किमतींच्या पार्श्वभूमीवर, महानगर गॅस लिमिटेडने (MGL) मुंबई आणि आसपासच्या परिसरात सीएनजीच्या दरात प्रति किलो २ रुपयांची वाढ केली आहे. तसेच घरगुती पाईप न्यॅच्युरल गॅस (PNG) च्या दरात प्रति स्टँडर्ड क्युबिक मीटरला (एससीएम) ५० पैशांची वाढ केली आहे. १५ दिवसांत ही दुसरी वाढ असून, सीएनजीचे दर ८६ रुपये प्रति किलो आणि पीएनजीचे दर ५२ रुपये प्रति एससीएम झाले आहेत.