प्रशांत कोरटकरच्या पोलीस कोठडीत वाढ; सुनावणीनंतर वकील असिम सरोदे म्हणाले…
इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना अश्लील शिवीगाळ करून धमकावणाऱ्या तथाकथित पत्रकार प्रशांत कोरटकरला न्यायालयाने दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. कोल्हापूर सेशन कोर्टात सुनावणीदरम्यान वकील असिम सरोदे यांनी कोरटकरला अटकेपासून संरक्षणाचा आदेश रद्द झाल्याचे सांगितले. कोरटकर फरार होता आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांनी त्याला मदत केली होती. पोलिसांनी त्याच्या सहा ठिकाणांच्या सीसीटीव्ही फुटेज तपासण्याची गरज असल्याचेही सरोदे यांनी नमूद केले.